Home > News Update > टोमॅटोचे दर आवाक्या बाहेर, महागाईचे सावट

टोमॅटोचे दर आवाक्या बाहेर, महागाईचे सावट

टोमॅटोचे दर आवाक्या बाहेर,  महागाईचे सावट
X

दररोजच्या जेवणात वापरला जाणाऱ्या टोमॅटोने शंभरी पार केली आहे. रोजच्या वापरात असणारा टोमॅटो महागल्याने सर्वसामान्य नागरिकांना टोमॅटोची चव चाखण पडणार नाही. टोमॅटो दर हा 100 ते 120 रु किलो ने विकला जात असल्यामुळे महागाईचा चटका सर्वांच बसणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दोन दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे बाजारात टोमॅटोच्या गाड्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. मात्र, दर वाढल्याने ग्राहक कमी झाले आहेत. सर्वसामान्य नागरिक टोमॅटो खरेदी पाठ फिरवत आहेत. टोमॅटो चे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. टोमॅटोचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर असलेतरी नागरिकांवर महागाईचे सावट कायम राहणा आहे

Updated : 26 Jun 2023 12:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top