पुणे-सातारा महामार्गचं काम होईपर्यंत टोलवसुली बंद

148

पुणे- सातारा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करणे. आणि खेड- शिवापूर टोल नाका “पीएमआरडीए’ हद्दीबाहेर हलविणे या दोन प्रमुख मागण्यांवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आज (सोमवार) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. महिनाभरात काम न झाल्यास सरकारला याबाबतचा प्रस्ताव पाठविणार आहे. “खेड-शिवापूर टोल नाक्याबाबत एक महिन्याचा वेळ दिला असून जर वेळेत काम झालं नाही, तर सरकारला फेब्रुवारीमध्ये प्रस्ताव पाठविला जाईल असं मत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केलं.”

या महामार्गाच्या कामांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवू, असा निर्णय रविवारी खेड-शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. खेड-शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीची रविवारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. टोलबाबत नितीन गडकरी यांच्या बरोबर बोलणं झालं आहे. त्याचप्रमाणे राज्यात टोल माफी व्हावी यासाठी मुख्यमंत्री यांच्या बरोबर ही चर्चा करणार
असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत स्पष्ट केलं.