Home > News Update > म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मध्यरात्री ट्विट करून माहिती

म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मध्यरात्री ट्विट करून माहिती

म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मध्यरात्री ट्विट करून माहिती
X

MHADA Exam : म्हाडाच्या विविध पदांच्या होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली. त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून शेअर केला.

या व्हिडिओत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की,

'सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो' असं आव्हाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान आव्हाड यांच्या या ट्विटनंतर उमेदवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सरकारने प्रत्येक परीक्षार्थीना थेट त्यांच्या खात्यात नुकसानभरपाई म्हणून 2000 रु. जमा करावेत, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने दिली आहे. आरोग्य विभागात पण तेच म्हाडामध्ये पण तेच. हा सरकारचा नियोजन शून्य कारभार आहे, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे.

आज सकाळी म्हाडाच्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार पदासाठी परीक्षा होणार होती तर दुपारी कनिष्ठ अभियंता पदाची होणार होती , ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी मध्यरात्री ट्विट करून दिली आहे. या परीक्षेसाठी आज सकाळच्या सत्रात 50 हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते. आज ही परीक्षा होणं अपेक्षित होतं परंतु मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांनी काही तांत्रिक कारणास्तव आपण ही परीक्षा पुढे ढकलत असल्याचं सांगितले आहे

Updated : 12 Dec 2021 2:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top