Home > News Update > आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; मात्र, पेट्रोल डिझेलच्या दराने गाठला आहे उच्चांक

आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; मात्र, पेट्रोल डिझेलच्या दराने गाठला आहे उच्चांक

आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; मात्र, पेट्रोल डिझेलच्या दराने गाठला आहे उच्चांक
X

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर उतार-चढाव पाहायला मिळत असताना त्याचा परिणाम देशांतर्गत इंधन दारांवर होत असतो मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल च्या दराने उच्चांक केला असताना आज मात्र,सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असून आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज 25 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहे. दरम्यान, काल सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 35 पैशांनी वाढ करण्यात आली होती. याआधी 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोलची किंमत 107.59 रुपये आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर आज 113.46 रुपये प्रतिलिटरवर स्थिर आहे. तर दिल्लीत डिझेल 96.32 रुपये प्रतिलीटर आहे तर मुंबईत डिझेल 104.38 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. देशातील प्रमुख महानगरांबाबत विचार केला तर, मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. ऑक्टोबरमध्ये तेलाच्या दरांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.कोलकाता येथे पेट्रोल 108.11 तर 99.43 प्रतिलीटर आहे, तर

चेन्नईत पेट्रोल 104.52 रुपये आणि डिझेल 100.59 रुपये प्रतिलीटर झाले आहे.

जगभरात कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठकीत, दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, तेंव्हा देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत असते.

Updated : 25 Oct 2021 3:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top