Home > News Update > का साजरा केला जातो विमुक्त जातींचा स्वातंत्र्य दिन?

का साजरा केला जातो विमुक्त जातींचा स्वातंत्र्य दिन?

का साजरा केला जातो विमुक्त जातींचा स्वातंत्र्य दिन?
X

आज भटक्या विमुक्त जातींचा स्वातंत्र्य दिन, याच दिवशी म्हणजेच 31 ऑगस्ट 1952 ला देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर येथे जाऊन विमुक्त जातींना DE notified Tribes म्हणजेच नोंदनिवर्जित जातींचा दर्जा दिला होता. विमुक्तांच्या सेटलमेंट कॅम्प मधून मुक्तता केली. या गोष्टीला 70 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हा दिवस भटक्या विमुक्त जाती स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात.

का साजरा केला जातो विमुक्त जातींचा स्वातंत्र्य दिन?

इंग्रजांनी 1871 मध्ये बेरड, फासेपारधी, वडार, बेस्तर, कोलाटी, बंजारा अश्या अनेक जाती जमातींना criminal tribes central act लावला होता. त्यांच्यावर जन्मजात गुन्हेगार म्हणून शिक्का मारला, अशा लोकांच्या जीवनातील आनंद साजरा करावा म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या पालावर जाऊन त्यांना जेवण घालून साजरा केला.

ते म्हणाले की, अन्न वस्त्र निवारा या पायाभूत सुविधा सुद्धा या लोकांना उपलब्ध नाहीत, शिक्षण नाही, आरोग्याच्या सोयी नाहीत, बालविवाह आणि शिक्षणापासून वंचीत असणाऱ्या या विमुक्त जातींना प्रवाहात आणण्यासाठी काम करावे लागेल. या जमाती असंघटित असलेले मतदार नसल्याने, भटकत असल्याने या देशातील राज्यकर्त्यांनी यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

मी मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून जबाबदारीने या गोष्टींचा पाठपुरावा करीत आहे. या भटक्या विमुक्त जाती जमातींचा इंपेरिकल डाटा गोळा करणे आवश्यक आहे. त्याचा फक्त निवडणूकीसाठी उपयोग न करता योजना-शिक्षण या गोष्टींसाठी व्हावा.

या लोकांकडे संवेदनशील पद्धतीने पाहिले जावे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी खूप मोठी चळवळ उभी करावी लागेल असं मत त्यांनी मनोगत व्यक्त केले. कोंढवा खडीमशीन या भागात हा विमुक्त दिन साजरा करण्यात आला. यावेळी विलास गडदे, बिरुदेव खांडेकर, प्रल्हाद पवार, इ. मान्यवर उपस्थित होते.

Updated : 31 Aug 2021 9:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top