प. बंगालमध्ये ममतांना दिलासा, सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल आघाडीवर
X
5 राज्यांच्या निवडणुकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या ट्रेन्ड्समध्ये एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार प.बंगालमधे चित्र दिसत आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असली तरी तृणमूल काँग्रेस काही जागांनी पुढे आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ममता बॅनर्जी सत्ता कायम राखणार असल्या तरी भाजप इथे जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या कलांवरुन एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरण्याची शक्यता आहे. 294 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 148 जागांची आवश्यकता आहे. या 148 जागांचे लक्ष्य तृणमूल काँग्रेस गाठू शकेल का याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी प. बंगाल जिंकण्यासाठी आपली सर्व ताकद लावून दिली होती. त्यामुळे प.बंगालमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.