Home > News Update > ST कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न - हरिभाऊ राठोड

ST कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न - हरिभाऊ राठोड

ST कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न -  हरिभाऊ राठोड
X

"एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता पूर्णपणे कर्मचारी संघटनांच्या हातून निसटला आहे. या संपाचा फायदा भाजपच्या आमदारांकडून घेतला जात आहे. कामगारांना भडकावून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, " असा आरोप भटके-विमुक्त, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. सरकारने चार पावले पुढे यावे आणि कामगारांनी दोन पावले मागे येऊन आपले हित कशामध्ये आहे, हे लक्षात घ्यावे, असे आवाहनही राठोड यांनी केले आहे. एसटी संपावर खासगीकरण हा उपाय नाही, असेही राठोड यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत हरिभाऊ राठोड यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

एसटीच्या खासगीकरणाचा फटका जसा कर्मचाऱ्यांना बसणार आहे तसाच प्रवाशांनाही बसणार आहे. मुळेच कर्मचाऱ्यांनी आपले हित ओळखून दोन पावले मागे यावे, असे आवाहनही राठोड यांनी केले. एसटी कामगारांच्या संपाचा राजकीय फायदा उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. एसटीमध्ये सर्वाधिक बहुजन वर्गातील म्हणजेच एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हिजेएनटी समूहाचे लोक नोकरी करीत आहेत. या वर्गाच्या हिताकडे पाहण्याऐवजी राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे या संपावर तोडगा काढण्याऐवजी खासगीकरणाबाबत सुतोवाच केले जात आहे. त्यामुळे आता "भीक नको पण कुत्रा आवर"अशी परिस्थिती कामगारांची झाली आहे, असेही राठोड यांनी म्हटले आहे. कामगारांनी हे कटकारस्थान ओळखून आपले हित कशात आहे, याचा विचार करून खासगीकरण व विलीनीकरण या दोन्हीं गोष्टीं बाजूला ठेऊन मध्यम मार्ग काढण्यासाठी दोन पावले मागे जाणे गरजेचे आहे. तर सरकारने चार पाऊले पुढे जावून बहुजन वर्गातील कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, असेही आवाहन हरिभाऊ राठोड यांनी केले आहे.

Updated : 20 Nov 2021 7:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top