Home > News Update > रॅगिंग प्रकरणी एका शिक्षकासह तीन विद्यार्थिनीवर गुन्हा दाखल

रॅगिंग प्रकरणी एका शिक्षकासह तीन विद्यार्थिनीवर गुन्हा दाखल

रॅगिंग प्रकरणी एका शिक्षकासह तीन विद्यार्थिनीवर गुन्हा दाखल
X

नांदेडमध्ये एका नर्सिंग काॅलेजच्या विद्यार्थींनी आणि काही वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील गोविंदराव पाटील पऊळ नर्सिंग काॅलेजमध्ये दोन दिवसांपुर्वी हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हदगाव पोलिस ठाण्यात एका शिक्षकासह तीन विद्यार्थींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठच दिवसापुर्वी नर्सिंग काॅलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनी सोबत सिनियर्सनी कपडे काढ, नाक घास, झाडू मार अशा प्रकारची रॅगिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडीत मुलीने याबाबतची तक्रार एका शिक्षकाकडे केली असता, संबंधित शिक्षकानेही वाईट उद्देशाने स्पर्श केल्याची तक्रार पीडीतेने केली आहे.

दरम्यान, यावर नर्सिंग काॅलेजच्या काही विद्यार्थ्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत असा कुठलाही प्रकार घडला नाही विद्यार्थीनी आणि शिक्षकाला सोडा अशी मागणी पोलीस ठाण्यात केली होती. हदगाव सारख्या ग्रामीण भागातही रॅगिंगच्या घटना घडू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.तपासा अंती सत्य काय ते समोर येईलच मात्र, ग्रामीण भागात देखील असे प्रकार समोर आल्याने पालकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

Updated : 16 Sep 2021 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top