Home > News Update > केडगावात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

केडगावात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

केडगावात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
X

अहमदनगर शहरातील केडगाव येथील एकाच कुटुंबातील तीघांचे मृतावस्थेत राहत्या घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आई, वडील आणि मुलगी गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले.

केडगाव देवी रोडवरील अथर्वनगरमधील ठुबेमळा येथील फाटक कुटुंबतील संदिप दिनकर फाटक, (वय 40), त्यांंची पत्नी किरण (वय 32) आणि मुुलगी मैथिली (वय 10 ) अशी मयतांची नावे आहेत. फाटक हे व्यावसायिक होते. परंतु, व्यवसायात अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज वाढत असल्याने संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीतून समजते आहे.

आज सकाळी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले आहेत.या घटनेन परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Updated : 6 Sep 2021 6:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top