Home > News Update > जगातील पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांमध्ये फक्त तीन भारतीय विद्यापीठांचा समावेश

जगातील पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांमध्ये फक्त तीन भारतीय विद्यापीठांचा समावेश

जगातील 1000 विद्यापीठांमध्ये भारताच्या किती विद्यापीठांचा समावेश, जगातील पहिल्या विद्यापीठांमध्ये कोणत्या देशाचा नंबर लागला? शिक्षणाच्या बाबतीत आशिया खंडात भारत कुठं आहे. धार्मिक विद्यापीठांची स्थिती काय आहे? वाचा शिक्षणात भारत कुठं आहे...

जगातील पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांमध्ये फक्त तीन भारतीय विद्यापीठांचा समावेश
X

नुकतंच क्वक्वरेली सिमंड्स ने (क्यूएस) (Quacquarelli Symonds) जागतिक विद्यापीठांचं रँकिंग जाहीर केलं आहे. या विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली आणि बंगळुरूमधील भारतीय विज्ञान संस्थान वगळता सलग पाचव्या वर्षी कोणत्याही भारतीय संस्थेने पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलेले नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत जगातील सर्वोच्च २०० विद्यापीठांमध्ये भारताच्या स्थानात कोणताही बदल झालेला नसल्याचं दिसून येतंय.

२०२० मध्ये कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला असताना, जगातील शैक्षणिक संस्था या ऑनलाइन शिक्षणाकडे वळल्या आहेत. त्यामुळे जगात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार,

लंडन मधील क्वक्वरेली सिमंड्स वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग (OSWUR) च्या ताज्या यादीमध्ये २०१७ पासून आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली आणि बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) वगळता इतर कोणतीही संस्था या क्रमवारीत स्थान मिळवण्यास पात्र ठरलेली नाही.

जगातील पहिल्या १ हजार शैक्षणिक संस्थांमध्ये मागील ५ वर्षांपासून भारतातील एकाही नवीन संस्थेची वाढ झालेली नाही. या १ हजार विद्यापीठांच्या यादीचा विचार केला तर या यादीत एकूण २२ भारतीय विद्यापीठ स्थान मिळवू शकले आहेत.

क्वक्वरेली सिमंड्स ने (Quacquarelli Symonds) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग च्या या यादीमध्ये 2021 मध्ये 21 विद्यापीठं, 2020 मध्ये 23 विद्यापीठं, 2019 मध्ये 24 तर 2018 मध्ये 20 विद्यापीठांना स्थान मिळालं होतं..

सोबतच गेल्या १२ महिन्यात २२ पैकी आयआयटी बॉम्बे, आयआयएस, आयआयटी रुड़की आणि ओपी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी या चार संस्थांचा क्रम घटला आहे. तर आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर, आयआयटी खडगपूर, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी हैदराबाद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ७ संस्थांच्या क्रमवारीत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी 14 विद्यापीठांची श्रेणी खाली आली होती, तर चारच्या क्रमवारीत वाढ झाली होती.

या व्यतिरिक्त, उल्लेखनीय बाब म्हणजे आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर, आयआयटी खडगपूर, आयआयटी गुवाहाटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ताज्या क्रमवारीत गेल्या पाच वर्षांत सर्वोत्कृष्ट क्रमांक मिळविला आहे.

उर्वरित सात संस्थांनी आपला दर्जा कायम राखला आहे. तर चार संस्था पहिल्यांदा या क्रमवारीत यशस्वी ठरल्या आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (५६१ - ५७०), पद्दुचेरी विद्यापीठ (८०१ - १००), आयआयटी भुवनेश्वर (७०१ - ७५०) आणि शिक्षण हे 'ओ' संशोधन (८०१ - १००) या विद्यापीठांचा समावेश आहे.

या रँकिंगवर उच्च शिक्षण सचिवांनी आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, "गेल्या वर्षी जाहीर झालेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षक आणि संशोधकांना प्रोत्साहन मिळाले आहे.. मुख्याध्यापक आणि संस्था प्रमुखांशी पंतप्रधानांनी केलेल्या चर्चेमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्वायत्तता व संशोधनाची नवीन संस्कृती वाढली, ज्यामुळे क्रमवारीत सुधारणा झाली आहे.

अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (बीएचयू) आणि अमृता विश्व विद्यापीठ आता पहिल्या १००० विद्यापीठांच्या यादीत राहिलेले नाहीत. सोबतच आयआयटी बॉम्बे विद्यापीठ सलग चौथ्या वर्षी भारतातील सर्वोत्कृष्ट उच्च शैक्षणिक संस्था असून 177 व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत विद्यापीठाचं स्थान पाच क्रमांकाने घसरलं आहे.

त्यानंतर आयआयटी दिल्ली दुसर्‍या क्रमांकावर आहे. आयआयटीने गेल्या 12 महिन्यांत आयआयएससी ला मागे टाकत 193 व्या स्थानावरुन 185 वे स्थान मिळवले आहे. आयआयएससी 186 व्या क्रमांकावर आले आहे. तरीही, ते जगातील सर्वोच्च संशोधन विद्यापीठापैकी एक आहे.

क्यूएसने दिलेल्या विधानानुसार, भारतीय विद्यापीठांनी शैक्षणिक आणि संशोधनात आपली कामगिरी सुधारली आहे, परंतु अजूनही भारतीय विद्यापीठ शैक्षणिक क्षमतेसाठी संघर्ष करीत आहेत.

जागतिक विद्यापीठांपैकी, मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (एमआयटी-अमेरिका) सलग दहाव्या वर्षी पहिले स्थान मिळवले आहे. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (इंग्लंड) ने २००६ नंतर प्रथमच दुसरं स्थान मिळवलं आहे, त्याचबरोबर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी (यूएसए) आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी (यूके) या विद्यापीठांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळवला आहे.

दरम्यान आशिया खंडातील विद्यापीठांपैकी 'नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर', 'नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी' तसेच चीनमधील 'झिनहुआ युनिव्हर्सिटी' आणि 'पेकिंग युनिव्हर्सिटी' यांनी जागतिक क्रमवारीतील पहिल्या २० मध्ये जागा मिळवली आहे.

Updated : 11 Jun 2021 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top