Home > News Update > शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दोन परीक्षांचा वेळ एकच असल्याने हजारो विद्यार्थ्यांचे होणार नुकसान

शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दोन परीक्षांचा वेळ एकच असल्याने हजारो विद्यार्थ्यांचे होणार नुकसान

शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दोन परीक्षांचा वेळ एकच असल्याने हजारो विद्यार्थ्यांचे होणार नुकसान
X

प्रातिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यात येणार SET परिक्षा आणि आरोग्य विभागाच्या ग्रुप D ची परिक्षा ही एक्काचं दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबर 2021रोजी घेण्यात येणार असल्याने याचा राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.

विशेष म्हणजे शासनाच्या वतीने या दोन्ही परीक्षेत वेळेचे अंतर देखील ठेवण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. या दोन्ही परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी तब्बल वर्षभर तयारी केली असून, आधीच शासनाकडून वर्ष वर्ष नोकरी भरती काढली जात नाही त्यात अशा पद्धतीने दोन पेपर एकाच दिवशी ठेवल्याने विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

दरम्यान, याबाबत मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना परीक्षार्थी अक्षय बाविस्कर याने म्हटले आहे की, या दोन्ही परीक्षेची आम्ही मागील वर्षभरापासून तयारी करत आहे,दोन्ही परीक्षेची तयारी आम्ही पूर्ण केली असताना आणि दोन्ही परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज भरली असताना आम्हाला कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे, त्यामुळे शासनाकडून आमचे आर्थिक , मानसिक नुकसान तर होणारच आहे, सोबत आमच्या भविष्याशी देखील हा खेळण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे शासनाने भले ही एकाच दिवशी परीक्षा घ्यावी मात्र, निदान दोन्ही पेपरमध्ये वेळेचे अंतर जास्त ठेवायला हवे जेणेकरून विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षेला हजेरी लावता येईल , त्यामुळे आम्ही राज्याचे आरोग्यमंत्री तसेच शिक्षणमंत्री यांना विनंती करतो की यावर तातडीने निर्णय व्हावा कारण परीक्षा अगदी दोन दिवसावर येऊन ठेपली आहे.

Updated : 24 Sep 2021 10:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top