Home > Election 2020 > हा पाकिस्तान आहे, भारत नाही !!! पाक न्यायालयाचा खोडसाळपणा...

हा पाकिस्तान आहे, भारत नाही !!! पाक न्यायालयाचा खोडसाळपणा...

हा पाकिस्तान आहे, भारत नाही !!! पाक न्यायालयाचा खोडसाळपणा...
X

कुठलंही लोकशाही सरकार नागरिकांच्या घटनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारांवर बंदी आणू शकत नाही, तसं झालं तर नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचं संरक्षण न्यायालयाला करावं लागेल...हा पाकिस्तान आहे भारत नाही असे धक्कादायक संतापजनक उद्गगार इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अतहर मीनाल्लाह यांनी काढले आहेत.

आवामी वर्कर्स पार्टी आणि पश्तून तहफ्फूझ मुव्हमेंटच्या २३ कार्यकर्त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान टीपणी करताना न्यायाधीश महोदयांनी भारताचा अनावश्यक उल्लेख केला. पाकिस्तानातील डाॅन या वृत्तपत्राने या वक्तव्या संदर्भातील बातमीत दिली आहे.

पश्तून प्रमुख मंझूर पश्तीन याच्या अटकेच्या निषेधार्थ आरोपी कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली होती. इस्लामाबाद पोलिसांनी आधी त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला होता. नंतर ते कलम वगळून दहशतवादविरोधी कायद्यातील कलम लागू केलं होतं. त्याविरोधात संबंधित कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

तुम्हाला निदर्शनं करायची असतील तर सरकारची परवानगी घ्या. नाही मिळाली परवानगी तर आम्ही आहोत.‌ नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी न्यायालय आहे. आम्ही प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करू, अशी टीपणी करत असता, न्या. मीनाल्लाह यांनी हा पाकिस्तान आहे, भारत नाही, अशी खोडसाळ टीपणी केली.

Updated : 18 Feb 2020 12:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top