Home > News Update > कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये, PMO ला समितीचा अहवाल सादर

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये, PMO ला समितीचा अहवाल सादर

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये, PMO ला समितीचा अहवाल सादर
X

कोरोना ची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना गृह मंत्रालयाने गर्त केलेल्या एका समितीने पंतप्रधान कार्यालयाला ऑक्टोबरमध्ये तिसरी लाटेची तीव्रता अधीक असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक असण्याची शक्यता व्यक्त केला जात आहे. एनआईडीएम च्या तज्ज्ञ समिती ने लहान मुलांच्या इलाजा संदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना सरकारला केल्या आहेत.

या समितीच्या अहवालानुसार देशात बालरोगतज्ज्ञ, कर्मचारी, रुग्णवाहिका तसंच उपकरणांची कमतरता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. देशात सरकारी दवाखान्यामध्ये ८२ टक्के बालरोगतज्ज्ञांची कमतरता आहे. असंही या अहवालात म्हटलं आहे.

हा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे. या समितीने सरकारला लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यातच लहान मुलांच्या लसीकरणाला देशात सुरुवात झालेली नाही. त्यामुळं लहान मुलांना याचा धोका अधिक असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे. दरम्यान तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तिव्रतेची असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Updated : 23 Aug 2021 8:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top