Home > News Update > बदलापुरात मोबाईलचं दुकान फोडून तब्बल दीड लाखांचा मुद्देमालाची चोरी

बदलापुरात मोबाईलचं दुकान फोडून तब्बल दीड लाखांचा मुद्देमालाची चोरी

बदलापुरात मोबाईलचं दुकान फोडून तब्बल दीड लाखांचा मुद्देमालाची चोरी
X

बदलापूर// बदलापुरमध्ये मोबाईलचं दुकान फोडून चोरट्यांनी तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. बदलापूर पूर्वेच्या शिरगाव आपटेवाडी परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

शिरगाव आपटेवाडी नाक्यावर तुषार पवार यांच्या मालकीचं आर. टी. इन्फोटेक नावाचं मोबाईलचं दुकान आहे. या मोबाईलच्या दुकानात बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे शटर वाकवून आत शिरले. त्यांनी दुकानाच्या काउंटरमध्ये ठेवलेला एक लॅपटॉप, काही मोबाईल फोन्स, स्मार्टवॉच, हेडफोन्स असा तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. विशेष म्हणजे शोकेसमधल्या नवीन मोबाईलला मात्र या चोरट्यांनी हात लावला नाही. तर दुकानात रिपेरिंगसाठी आलेले फोन चोरट्यांनी चोरून नेले.

चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेमुळे बदलापूर शहरात पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी दुकानं फोडणारी चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचं दिसत आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भादंवि 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.

Updated : 19 Nov 2021 2:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top