Home > News Update > खडसे कुटुंबीयांच्या अडचणीत होणार वाढ

खडसे कुटुंबीयांच्या अडचणीत होणार वाढ

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. खडसे यांना अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. केवळ खडसेच नाही तर खडसे कुटुंबाला ही नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

खडसे कुटुंबीयांच्या अडचणीत होणार वाढ
X

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी पुन्हा वाढ झाली आहे. अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी त्यांना तब्बल १३७ कोटी, १४ लाख, ८१ हजार ८८३ रुपये दंड आकारण्यात आला असून, त्यासंदर्भात मुक्ताईनगर तहसीलदारांनी नोटीस बजावली असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान यासंदर्भात प्रतिक्रिया देताना : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे म्हणाले की मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारात शेतजमिनी आमच्या नावावर असल्या, तरी अवैधरीत्या गौण खनिजाच्या उत्खननाशी आमचा संबंध नाही. १३७ कोटी रुपये दंडासंदर्भात नोटिशीवर अपील करता येते. माझे विरोधक आमदार चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्या हाती काहीही लागत नाही. मी महसूलमंत्री असताना त्यावेळची प्रकरणे ते काढत आहेत. हा सर्व प्रकार राजकीय षड्यंत्राचा खेळ आहे. वेळ आल्यानंतर योग्य उत्तर देणार आहे असल्याचं खडसे म्हणाले

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात मुरूम उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी, खडसे कुटुंबीयांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमिनीची खरेदी करण्यात आली असून, तेथून राष्ट्रीय महामार्गासाठी ४०० कोटींच्या गौण खनिजाचे उत्खनन करीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.


Updated : 20 Oct 2023 3:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top