Home > News Update > दया..कुछ तो गडबड जरूर है.! अनिल देशमुखांच्या सीबीआय धाडसत्रावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

दया..कुछ तो गडबड जरूर है.! अनिल देशमुखांच्या सीबीआय धाडसत्रावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

दया..कुछ तो गडबड जरूर है.! अनिल देशमुखांच्या सीबीआय धाडसत्रावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
X

राज्यातील कोरोना उद्रेका पूर्वी अंटालिया स्पोटक, सचिन वाझे, परमवीर सिंग लेटर बॉंब आणि त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची अखेर आ सीबीआय धाडे मध्ये झाली.यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित करत 'दया, कुछ तो गडबड जरूर है,' असं म्हटलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला.

सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करत छापेमारीही सुरू केली. देशमुख यांच्यावर अचानक करण्यात आलेल्या धाडसत्रा वरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना मध्ये संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्र करोना संकटाचा मुकाबला करत असतानाच राजकीय वर्तुळात अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईने खळबळ उडाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच सीबीआयने अनिल देशमुख यांच्यासह प्रकरणाशी संबंधित असलेल्या इतरांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर देशमुख यांच्या घर आणि कार्यालयांची झाडाझडती सुरू असून, या कारवाईवर राऊत यांनी ट्विट करत शंका व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत न्यायालयाचे आदेश आणि सीबीआयची कारवाई याच्या तफावत असल्याचं सांगत धाडी टाकणं अतिरेक असल्याचं म्हटलं आहे. "कुछ तो गडबड है… मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुखांवर धाडी. एफ.आय.आर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया..कुछ तो गडबड जरूर है," असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Updated : 24 April 2021 9:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top