Home > News Update > पीएम केअर फंडातील 90 टक्के व्हेंटिलेटरमध्ये काहीच अडचणी नाही: फडणवीसांचा दावा

पीएम केअर फंडातील 90 टक्के व्हेंटिलेटरमध्ये काहीच अडचणी नाही: फडणवीसांचा दावा

व्हेंटिलेटरवरून राजकारण करू नयेत, असंही फडणवीस म्हणाले.

पीएम केअर फंडातील 90 टक्के व्हेंटिलेटरमध्ये काहीच अडचणी नाही: फडणवीसांचा दावा
X

राज्यात वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता केंद्र सरकारने अनेक जिल्ह्यांना पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले होते. मात्र त्यातील अनेक व्हेंटिलेटर बंद पडत असल्याचे तक्रारी येत आहे. मात्र व्हेंटिलेटर बंद पडल्याच्या घटना किंचित ठिकाणी घडल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

औरंगाबाद येथे भाजप आमदारांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी आलेल्या फडणवीसांना पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याचं प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, फक्त काहीच ठिकणी व्हेंटिलेटर बंद पडले आहे, 90 टक्के व्हेंटिलेटर उत्तम आहेत.

तसेच फक्त पाच-दहा ठिकाणी व्हेंटिलेटरमध्ये छोट्या-छोट्या अडचणी आल्या आहेत. परंतु आशा ठिकाणी टेक्निशियन यांनी जाऊन ते दुरुस्त केले असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

शेवटी व्हेंटिलेटर सुद्धा मशीनच आहे, परंतु केंद्र सरकारने दिलेल्या व्हेंटिलेटरचं व्यवस्थित स्टोरेज केलं गेलं नाही. त्याच डंपिंग करून ठेवण्यात आलं, यामुळे ह्या अडचणी निर्माण झाल्या असल्याचं फडणवीस म्हणाले.

तसेच केंद्र सरकारने राज्याला 5 हजार पेक्षा अधिक व्हेंटिलेटर दिले आहे, मात्र फक्त राजकारण म्हणून असं सगळीच व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचं बोलू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

Updated : 17 May 2021 8:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top