Home > News Update > 'या' जिल्ह्यात आज कोरोना चा एकही रुग्ण नाही

'या' जिल्ह्यात आज कोरोना चा एकही रुग्ण नाही

या जिल्ह्यात आज कोरोना चा एकही रुग्ण नाही
X

जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित झालेला एकही रुग्ण आज 18 जून रोजी आढळून आलेला नाही. आजच्या प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालावरून स्पष्ट झाले.त्यामुळे सलग सहा दिवसापासून जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णामुळे आज कोरोनाला ब्रेक लागला आहे.

जिल्ह्यात सलग मागील सहा दिवसात 33 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.आज नवा कोरोना बाधित रुग्ण आढळून न आल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

26 मार्चला एक रुग्ण,19 मे रोजी दोन रुग्ण, 21 मे रोजी सत्तावीस रुग्ण,

22 मे रोजी दहा रुग्ण, 24 मे रोजी चार रुग्ण, 25 मे रोजी चार रुग्ण, 26 मे रोजी एक रुग्ण, 27 मे रोजी एक रुग्ण, 28 मे रोजी नऊ रुग्ण, 29 मे तीन रुग्ण, 30 मे रोजी चार रुग्ण, 31 मे रोजी एक रुग्ण, 2 जून रोजी दोन रुग्ण,12 जून रोजी एक रुग्ण ,13 जून रोजी एक रुग्ण, 14 जून रोजी एक रुग्ण,15 जून रोजी चौदा रुग्ण,16 जून रोजी पंधरा रुग्ण आणि 17 जून रोजी एक रुग्ण असे एकूण 102 कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळले.

जिल्ह्यात आढळलेले 102 कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/मोरगाव तालुका - 31,सडक/अर्जुनी तालुका - 10, गोरेगाव तालुका - 4, आमगाव तालुका -1, सालेकसा तालुका - 2, गोंदिया तालुका - 22 आणि 32 रुग्ण हे तिरोडा तालुक्यातील आहे.

गोंदियाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी आतापर्यंत 1512 घशातील स्त्राव नमुने पाठविण्यात आले. त्यामध्ये 102 रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले.प्रयोगशाळेत 82 नमुन्यांचा चाचणी अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यातील 69 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले असून आज एकही कोरोना बाधित रुग्ण आढळुन आला नाही. जिल्ह्यात एकूण 102 कोरोना बाधित रुग्ण आहेत.त्यापैकी क्रियाशील रुग्ण 33 आहे.

जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 955 आणि घरी 1783 असे एकूण 2738 व्यक्ती अलगीकरणात आहेत.

Updated : 19 Jun 2020 7:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top