Home > News Update > बीड जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्याच्या घरीच चोरी, लाखोंचा माल लंपास

बीड जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्याच्या घरीच चोरी, लाखोंचा माल लंपास

बीड जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्याच्या घरीच चोरी, लाखोंचा माल लंपास
X

बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत चर्चेला आला होता. भाजपसह राष्ट्रवादीच्या आमदारांनीही जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर असल्याचे यावेळी सांगितले. पण आता बीड जिल्ह्यात पोलीस सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यातील आंबेजोगाई शहरातील पोलीस निरीक्षकांच्या घरीच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. पोलीस अधिकाऱ्यांची घरं सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांनी काय करावे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.




आंबेजोगाईमध्ये चोरट्यांनी सहायक पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांचे घर फोडून सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. रवींद्र शिंदे हे सध्या आंबेजोगाई अपर अधीक्षक कार्यालयात वाचक पदावर आहेत. ते आंबेजोगाई शहरातील पिताजी सारडा नगरीत राहतात.





शिंदे यांचे सर्व कुटुंबीय बीडला गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला पोलीस अधीक्षक जबाबदार असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात केली होती. यानंतरही दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडल्याने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Updated : 9 March 2022 1:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top