Home > News Update > ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांच्या जीवाला धोका; संरक्षण देण्याची संजय राऊत यांची मागणी

ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांच्या जीवाला धोका; संरक्षण देण्याची संजय राऊत यांची मागणी

ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांच्या जीवाला धोका; संरक्षण देण्याची संजय राऊत यांची मागणी
X

भारतीय जनता पार्टीच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानानंतर देशभर अनुचित प्रकार घडले आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंच्या जीवाला धोका असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी दवेंचे संरक्षण करण्याची मागणी शिवसेना खा. संजय राऊत यांनी केली आहे.

देशात मागील काही दिवसात नुपूर शर्मा हिने प्रेषित मोहम्मद पैगंबराबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर देशात आणि परदेशामधे मोठा उद्रेक झाला होते. भाजपनं संबधीतांचे राजीनामे घेतले. परंतू सोशल मिडीयातील पोस्टमुळे दोन तरुणांना कन्हैय्या लाल नावाच्या टेलरची हत्या केली होती. त्यानंतर अमरावतीमधे देखील २१ जूनला दुचाकीवर आलेल्या आरोपींनी चाकू भोकसून उमेश कोल्हे या केमिस्टची हत्या केल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणांनी आनंद दवेंना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आनंद दवेंनी यापूर्वी समाजमाध्यमांमधून समाजविघातक विधानं केली आहे.


आनंद दवेंना मिळालेल्या इशाऱ्यामुळे त्यांना पोलिस सरंक्षण द्यावे अशी मागणी खा. संजय राऊत यांनी ट्विट करुन दिले आहे. रोज पत्रकार परीषद घेऊन महाविकास आघाडीची बाजू मांडणारे संजय राऊत आता राज्य सरकारला पोलिसांना आनंद दवेंसाठी संरक्षण मागत

असल्याचे सोशल मिडीयावर वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

Updated : 5 July 2022 9:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top