Home > News Update > नदीच्या पुलावर स्टंटबाजी करणारा तरुण गेला वाहून

नदीच्या पुलावर स्टंटबाजी करणारा तरुण गेला वाहून

नदीच्या पुलावर स्टंटबाजी करणारा तरुण गेला वाहून
X

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये मागील चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे मांडेगावच्या चांदणी नदीला पूर आला आहे. दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्याने या पुलावरून प्रवास करु नये असे आवाहन केले जात असताना दुसरीकडे या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.

चांदणी नदीच्या पुलावर काही अतिउत्साही तरुण स्टंटबाजी करत असताना त्यातला एक तरुण पाण्याच्या लोंढ्यामध्ये वाहून गेला, नशीब बलवत्तर म्हणून तीन किलोमीटरच्या अंतरावर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

पांडुरंग कदम असं या अतिउत्साही स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान संबंधित पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करत असताना आणि तो पुराच्या पाण्यात वाहून जातानाचा व्हिडीओ नदीच्या काठावर उभे असलेल्या व्यक्तीने मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. या तरुणाच्या सुदैवाने त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले मात्र, अशाच घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने स्वतःच्या जीवाशी खेळू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान संबंधित युवकावर काही कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Updated : 26 Sep 2021 11:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top