Home > News Update > दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या महिलेचे केलं मनपरिवर्तन

दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या महिलेचे केलं मनपरिवर्तन

दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या महिलेचे केलं मनपरिवर्तन
X

सोलापुरात दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या महिलेचे स्थानिक नगरसेविकेनं मनपरिवर्तन केलं आहे.त्यामुळे एक मोठी घटना टळली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने संपूर्ण परिस्थितीच बदलून टाकली आहे. यामध्ये सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील बनले आहे. अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळे चुली पेटणे अवघड झाले आहे.अशा परिस्थितीत जीवाचे बरे वाईट करण्याची मानसिकता वाढू लागली आहे. अशच विचार मनात घेऊन आपल्या दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या मातेचे नगरसेविका फिरदोस पटेल यांच्यामुळे प्राण वाचले आहे.

निलोफर महिबूब शेख ( वय ३५ ) हि महिला सिमरन महिबूब शेख ( वय ११ ) आणि मुलगी, रेहान महिबूब शेख ( वय ८) हा मुलगा यांना सोबत घेऊन संभाजी तलावाजवळ आत्महत्या करण्यासाठी आलेली होती.

ही घटना नगरसेविका फिरदोस पटेल यांना समजताच त्यांनी त्या महिलेला तलावापासून बाजूला घेत पोलिसांना बोलावून त्यांची व्यथा जाणून घेतली. त्यांनतर त्यांनी तिला आणि मुलांना आपल्या गाडीतून घरी नेले.अडचण जाणून घेऊन त्यांना एक महिन्याचे जीवनावश्यक साहित्य भरून देत तिचे घरभाडे देऊन जगण्याचा आधार दिला.

शिवाय तिच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च स्वतः नगरसेविका पटेल यांनी उचलला आहे.नगरसेविका पटेल यांच्या सतर्कतेमुळे आपले कुटुंब आत्महत्येपासून परावृत्त झाल्याची भावना निलोफर यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी नगरसेविका पटेल यांचे आभार मानलेत.

Updated : 12 Sep 2021 11:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top