Home > News Update > भारत-चीन यांच्यातील लष्करी पातळीवर तेराव्या चर्चेची फेरी संपली

भारत-चीन यांच्यातील लष्करी पातळीवर तेराव्या चर्चेची फेरी संपली

भारत-चीन यांच्यातील लष्करी पातळीवर तेराव्या चर्चेची फेरी संपली
X

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील वादावर काल भारत-चीनमध्ये तेरावी महत्त्वाची बैठक पार पडली. लडाखमधील सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर लष्करी पातळीवर चर्चेची ही तेरावी फेरी होती. चर्चेची ही तेरावी फेरी तब्बल आठ तास सुरू होती. दरम्यान, या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर आणि काय चर्चा झाली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. चीनमधील पीएलए सेनेच्या मेल्दो गॅरिसनमध्ये ही बैठक झाली. पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीवरील तणाव संपवण्यासाठी लष्करी पातळीवर या तेराव्या चर्चेच्या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पूर्व लडाखच्या गरम पाण्याच्या झऱ्यापासून मागे हटण्यावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. 12 फेऱ्यांच्या बैठकीदरम्यान, पूर्व लडाखला लागून असलेल्या वास्तविक नियंत्रण रेषेच्या फिंगर एरिया, कैलाश हिल रेंज आणि गोगरा भागात विघटन करण्यात आलं होतं. पण हॉट स्प्रिंग, डेमचोक आणि डेपसांग मैदानावर अजूनही तणाव कायम आहे. याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

भारताच्या बाजूने, लेह स्थित 14व्या कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल पी.जी.के मेनन यांनी बैठकीत भाग घेतला होता. तर दक्षिणी झिंजियांग मिलिटरी डिस्ट्रिक्टचे कमांडर चिनच्या बाजूने बैठकीचे प्रतिनिधित्व करत होते.

Updated : 11 Oct 2021 3:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top