Home > News Update > शिवसेनेचा मुख्यमंत्री हीच गोड बातमी..

शिवसेनेचा मुख्यमंत्री हीच गोड बातमी..

शिवसेनेचा मुख्यमंत्री हीच गोड बातमी..
X

सत्ता स्थापनेच्या चढाओढी गेल्या कित्येक दिवसापासुन सुरु आहेत. मात्र, आता भाजपाचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या दोन दिवसात कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल असं स्पष्ट केलं होतं. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होईल अशी गोड बातमी सुधीर मुनगंटीवार घेऊन येतील असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलयं.

https://youtu.be/SFni4bvfhpE

काय आहे अग्रलेखात?

राज्यात महायुतीचे सरकार येईल अशी गर्जना चंद्रकांत पाटील वगैरे भाजपाच्या नेत्यांनी केली आहे. त्यांच्या तोंडात साखर पडो. कारण सुधीर मुनगंटीवार यांनी गोड बातमी मिळेल असा दावा केला आहे. प्रश्न इतकाच आहे की ते सरकार नक्की कधी येईल वर ही महायुतीकी नक्की कुणाची व कशी? हे दादा वगैरे मंडळींनी सांगितलेले नाही.

भाजपा महायुतीचा विचार करत आहे. भाजपाचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोड बातमीचे दाखले दिले आहेत. आता गोड बातमी म्हणजे नेमकी कोणती? सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कुणाचे लग्न वगैरे ठरले आहे? त्यासाठी लाडवाची की बासुंदीची जेवणावळ देणार आहेत. शेवटी आपल्याकडे गोड बातमीचा संदर्भ लग्न किंवा बारसे याच्याशी जोडला जातो.

अर्थात गोड बातम्यांचे कितीही दाखले दिले तरीही पाळणा हलणार का? पाळणा कसा हलेल सुधीर मुनगंटीवार यांच्या गोड बातमी या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. निकाल लागून तेरा दिवस उलटले तरीही सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेनेने आधी ठरल्याप्रमाणे सत्तेत अर्धा वाटा मागितला आहे. त्यामुळे सत्तेचा पेच कधी सुटणार कधी सत्ता स्थापण होणार याकडे पाहण गरजेचं ठरेल..

Updated : 7 Nov 2019 5:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top