Home > News Update > सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे अखेर पोलिसांच्या ताब्यात... कोण आहेत हे गुन्हेगार? व्हिडीओ होतोय व्हायरल

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे अखेर पोलिसांच्या ताब्यात... कोण आहेत हे गुन्हेगार? व्हिडीओ होतोय व्हायरल

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे अखेर पोलिसांच्या ताब्यात... कोण आहेत हे गुन्हेगार? व्हिडीओ होतोय व्हायरल
X

बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या घरावर १४ एप्रिल रोजी(रविवार) दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. मुंबई गुन्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास सूरू होता. हा गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करत या दोन आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. सदरील आरोंपीची ओळख पटवण्यात आली असून, यासंदर्भात पोलीसांकडून व्हिडीओसुध्दा शेअर करण्यात आला आहे.

अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने गुजरातच्या भुज येथून अटक केली आहे. विकी गुप्ता (Vicky Gupta) आणि सागर पाल (Sagar Pal) अशी या दोघांची नावं आहेत. त्यांचा व्हिडीओ भुज पोलिसांनी शेअर केला आहे.

गोळीबार करणाऱ्या या दोन आरोपींना गुजरात पोलीसांनी गुजरातमधील भुज इथुन १५ एप्रिल रोजी रात्री उशीरा अटक केली. या अटकेची मुंबई पोलीसांनी माहिती दिली. तसेच याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी त्या आरोपींना मुंबईत आणलं जाईल, अशीही माहिती मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

गोळीबार करण्यासाठी आलेल्या आरोपींनी जी दुचाकी (Bike) वापरली होती, ती परत जाताना एक किलोमीटर अंतरावर एका चर्चजवळ सोडली होती. त्यानंतर ते दोघे कुणाला संशय येऊ नये म्हणून काही अंतर पुढे चालत गेले. मग तिथून त्यांनी रिक्षा केली आणि वांद्रे रेल्वे स्थानकावर पोहचले. तिथून ते बोरीवली जाणाऱ्या लोकलमध्ये चढले. दोघांनी जाता जाता कपडे बदलले असावेत, असा पोलीसांचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जाईल, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.


Updated : 16 April 2024 6:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top