Home > News Update > 'मिशन 100 कोटी' काही तासातच पूर्ण होणार; सेलिब्रेशनसाठी केंद्र सरकारची जय्यत तयारी सुरु

'मिशन 100 कोटी' काही तासातच पूर्ण होणार; सेलिब्रेशनसाठी केंद्र सरकारची जय्यत तयारी सुरु

मिशन 100 कोटी काही तासातच पूर्ण होणार; सेलिब्रेशनसाठी केंद्र सरकारची जय्यत तयारी सुरु
X

मुंबई : भारतात 100 कोटी कोरोना प्रतिबंधक डोसचा विक्रमी टप्पा अवघ्या काही तासातच पूर्ण होणार आहे. हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण आहे, या क्षणाच्या सेलिब्रेशनसाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी सुरु केली आहे. 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण झाल्यावर याची घोषणा सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या जल्लोषात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

देशात आत्तापर्यंत 99 कोटी 85 लाख 55 हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग असाच कायम राहिल्यास 100 कोटी डोसचा टप्पा अवघ्या काही तासातच पूर्ण होण्याची शक्यता आहे. 100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.महाराष्ट्रातील औरंगाबादच्या बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, पुण्यातील शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आणि मुंबईतल्या सीएसएमटीला देखील रोषणाई करण्यात येणार आहे.

Updated : 21 Oct 2021 4:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top