Home > News Update > पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याचं खरं कारण आलं समोर, वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याचं खरं कारण आलं समोर, वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याचं खरं कारण आलं समोर, वाचा
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सोशल मीडिया सोडणार असल्यासंदर्भात ट्विट केलं होतं. त्यानंतर सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रतिक्रीया उमटल्या होत्या. पंतप्रधान मोदी सोशल मीडिया का सोडत आहेत असा सवाल विचारला जात होता. आता याचं खरं कारण समोर आलं आहे. स्वतः पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात ट्विट करत खुलासा केला आहे.

८ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे. यादिवशी ज्या महिलांचे जीवन आणि कार्य प्रेरणा देतं अशा महिलांसाठी पंतप्रधान मोदी आपले सोशल मीडिया अकाऊंट्स देणार आहेत. यामुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळेल असं मोदींचं म्हणणं आहे.

Updated : 3 March 2020 8:02 AM GMT
Next Story
Share it
Top