Home > News Update > अधिवेशनाचे दोन दिवस शिल्लक ; विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन आज वातावरण तापण्याची शक्यता

अधिवेशनाचे दोन दिवस शिल्लक ; विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन आज वातावरण तापण्याची शक्यता

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरलेत. या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकार राज्यपालांच्या मंजुरीच्या प्रतीक्षा आहेत. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार याबाबत उत्सुकता कायम आहे.

अधिवेशनाचे दोन दिवस शिल्लक ; विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन आज वातावरण तापण्याची शक्यता
X

मुंबई // महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरलेत. या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकार राज्यपालांच्या मंजुरीच्या प्रतीक्षा आहेत. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार याबाबत उत्सुकता कायम आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपाल सरकारला अडचणीत आणण्यासाठी काही वेगळा निर्णय घेणार का ? याकडेही सर्वांचेच लक्ष लागलं आहे. दरम्यान कालच महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन देण्यात आलं. .

अध्यक्षपदाची निवडणूक या दोन दिवसांत पार पडावी, यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करून आज निर्णय कळवणार असल्याचं सांगितल्याचा दावा नेत्यांनी केला.

मंगळवारी अधिवेशनांचे सूप वाजणार आहे, आज विरोधक राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था, कोरोना काळातील भ्रष्टाचार, महिला अत्याचार या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विधान परिषदेत अरबी समुद्रात शिवाजी महाराज स्मारक यावर लक्षवेधी आहे.त

Updated : 27 Dec 2021 2:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top