Home > News Update > सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीचा मालक अखेर आला समोर, कोण आहे मालक?

सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीचा मालक अखेर आला समोर, कोण आहे मालक?

सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीचा मालक अखेर आला समोर, कोण आहे मालक?
X

सचिन वाझे प्रकरणात वेगवेगळे खुलासे समोर येत आहे. विरोधक सरकारला वारंवार घेरण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या बैठकावर बैठका सुरु आहेत. यामध्ये सचिन वाझे पोलिसांच्या गाडीबरोबरच मर्सिडीज वापरत असल्याचं समोर आलं आहे. मात्र, ही मर्सिडीज कोणाची असा प्रश्न निर्माण झाला असताना या मर्सिडीजचे मालक स्वत: समोर आले आहे. उद्योजक सारांश भावसार यांची ही गाडी आहे. ते म्हणाले...

सचिन वाझे प्रकरणामधील मर्सडीज गाडी माझीच होती. परंतू ती गाडी मी फेब्रुवारी मधेच car24 या online कंपनी ला विकली होती.

त्यामुळे या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही.

ते म्हणाले...

ही गाडी माझी होती. परंतु, फेब्रुवारी महिन्यात ही गाडी मी विकली आहे. त्याबाबतचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि तपास अधिकाऱ्यांकडून विचारणा झाल्यास त्यांना सहकार्य करेन. ज्याच्याशी माझा व्यवहार झाला त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत. तपास यंत्रणेला काही माहिती हवी असल्यास सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली.

Updated : 17 March 2021 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top