Home > News Update > धक्कादायक! पालघरमध्ये चिकन सेंटरच्या मालकावर गोळीबार

धक्कादायक! पालघरमध्ये चिकन सेंटरच्या मालकावर गोळीबार

धक्कादायक! पालघरमध्ये चिकन सेंटरच्या मालकावर गोळीबार
X

पालघर// पालघर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी एका चिकन सेंटरच्या मालकावर गोळीबार केला आहे. जावेद लुलानिया असे हल्ला झालेल्या चिकन सेंटर मालकाचे नाव आहे. या हल्ल्यात लुलानिया हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा हल्ला का झाला, हल्लेखोर कोण होते? याबाबत माहिती समोर आलेली नाही.

पालघरमधील नजर अली चाळ परिसरात ही गोळीबाराची घटना घडली आहे. जावेद लुलानिया यांचे या परिसरात दुकान आहे. दुकानासमोरच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले होते, त्यांनी लुलानिया यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात लुलानिया जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला का झाला हे अद्याप समोर आले नाही.

दरम्यान गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मात्र, या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा हल्ला का करण्यात आला? हल्लेखोर कोण होते याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Updated : 17 Nov 2021 3:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top