Home > News Update > नायजेरियाहून आलेल्या Omicron बाधित रुग्णाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

नायजेरियाहून आलेल्या Omicron बाधित रुग्णाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

राज्यात कोरोनाच्या Omicron या नव्या विषाणूच्या संसर्गाचा विळखा वाढत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, राज्यातील 198 ओमिक्रॉनबाधित रुग्णांयापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

नायजेरियाहून आलेल्या Omicron बाधित रुग्णाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
X

पुणे // राज्यात कोरोनाच्या Omicron या नव्या विषाणूच्या संसर्गाचा विळखा वाढत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, राज्यातील 198 ओमिक्रॉनबाधित रुग्णांयापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. गेल्या आठवड्यात दरदिवशी 20 ते 30 च्या संख्येने आढळणाऱ्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत आज प्रचंड मोठी वाढ होताना दिसत आहे. ज्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे खरंतर त्याचं दोन दिवसांपूर्वीच निधन झालं आहे. त्याचा NIA रिपोर्ट समोर आल्यानंतर त्याला ओमिक्रॉनची लागण झााली होती, अशी माहिती समोर आली आहे. पण रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. महापालिका हद्दीतील काल तीन रुग्णांचे एनआयव्ही रिपोर्ट समोर आलेत. यात तीन जणांना ओमायक्रोनची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यापैकी एकजण हा नायजेरियातून आला होता. तर उर्वरित दोन रुग्ण हे त्याचे निकटवर्तीयच असल्याचं समोर आलं आहे. नायजेरिया येथून आलेल्या रुग्णाचा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील रुबी एलकेअर कार्डीयाक सेंटर येथे 28 डिसेंबरला हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या रुग्णाचा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. या रुग्णाची ओमिक्रॉनची लागण प्रासंगिक निदान असल्याचं महापालिकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

Updated : 31 Dec 2021 3:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top