Home > News Update > राजकीय निवडणूक लढविण्याबाबातचे वृत्त अधिकृत नाही !

राजकीय निवडणूक लढविण्याबाबातचे वृत्त अधिकृत नाही !

राजकीय निवडणूक लढविण्याबाबातचे वृत्त अधिकृत नाही !
X

मुंबई - '' भाजपा नेत्यांनी सांगितल्यास निवडणूक लढवेन असे मत निवृत्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी व्यक्त केल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र राजकीय निवडणुकांबाबत आपण कुठेही भाष्य केले नसल्याची स्पष्टोक्ती राधेश्याम मोपलवार यांनी दिली आहे. तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालकपदावरून निवृत्त होऊन राज्यात विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाली उभारण्यात आलेल्या आणि एक वर्षापासून कार्यान्वित असलेल्या आणि यापूर्वीच महासंचालकपदी नियुक्ती असलेल्या वॉररुमची जबाबदारी पूर्णपणे पाहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शासकीय सेवेतील निवृत्त सनदी अधिकारी राधेयश्याम मोपलवार यांना नुकतेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन मुक्त करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष मोपलवार यांनी एमएसआरडीसीचा कार्यभार सांभाळला होता. या पदावरून मुक्त होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाली राज्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पाना गती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या वॉररूमची जबाबदारी पूर्णपणे सांभाळण्यासाठी या पदावरून मुक्त करण्यात यावे अशी विनंती स्वतः मोपलवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. तसेच या व्यतिरिक्त कोणतेही कारण नसल्याचे मोपलवार यांनी स्पष्ट केले होते. राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यांनतर लगेचच राधेश्याम मोपलवार यांची राज्यात विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा वॉररुमच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या कार्यभारासमवेतच त्यांच्याकडे एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक पदातून त्यांच्या विनंती नुसार सरकारने त्यांची पदमुक्ती केली आहे. मात्र असे असतानाही मोपलवार भाजपच्या गोटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे वृत्त काही ठिकाणी छापून आले आहे. मात्र याबाबत आपण कोणतेही वक्तव्य अथवा भाष्य केले नसल्याची स्पष्टोक्ती राधेश्याम मोपलवार यांनी दिली आहे. यामुळे निवृत्ती नंतर मोपलवार भाजपच्या वतीने निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना पूर्ण विराम लागला आहे.


मी भाजपच्या वतीने निवडणूक लढवेन अशा आशयाचे वृत्त काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मात्र याबाबत मी कोणाशीही चर्चा केलेली नसल्याने हे वृत्त चुकीचे आहे. आज विविध ठिकाणी मी निवडणूक लढविणार असल्याच्या बातम्या म्हणजे माझ्या हितचिंतकांच्या मनातील विचार आहेत.

Updated : 2 Dec 2023 5:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top