राष्ट्रीय उत्तर भारतीय समाज पक्ष आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक
X
कोरोना काळात युद्धस्तरावर काम करणारे वैज्ञानिक, डॉक्टरांना चिकित्सक भारतरत्न देण्याची मागणी राष्ट्रीय उत्तर भारतीय समाज पक्षाने केली आहे,
या संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार शर्मा यांनी राष्ट्रपती, गृहमंत्री व आरोग्यमंत्री यांना पत्र पाठवून कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या डॉक्टरांना, संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना चिकित्सक भारत रत्न, चिकित्सक महावीर रत्न, चिकित्सक वीर रत्न देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार शर्मा यांनी म्हटले आहे की, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी १ ऑक्टोबरला रात्री १२ वाजल्यापासून राष्ट्रीय स्तरावर धरणे आंदोलन, प्रदर्शनं केलं जाईल.सोबतच त्यांनी म्हटले आहे की, पक्षाने गेले काही दिवसापासून देशहित व कोरोना काळात काम करणाऱ्यांना , रिक्षा, टॅक्सी चालकांना होणाऱ्या समस्या व त्यांच्यावरील कर्जाबद्दल अनेक मागण्या सरकारकडे केल्या आहेत.त्या देखील सरकारने तातडीने पूर्ण कराव्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव दिन मोहमद, राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष भारद्वाज व अनिल श्रीवास्तव, मुंबई युवा अध्यक्ष हसन शेख, महाराष्ट्र उपाध्यक्ष शरीफ कुरेशी, पूनम स्वराज आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते