Home > News Update > मुंबईतील या रेल्वे स्टेशनची बदलणार नावे..! काय असतील या स्टेशनची नविन नावे? जाणून घ्या

मुंबईतील या रेल्वे स्टेशनची बदलणार नावे..! काय असतील या स्टेशनची नविन नावे? जाणून घ्या

मुंबईतील या रेल्वे स्टेशनची बदलणार नावे..! काय असतील या स्टेशनची नविन नावे? जाणून घ्या
X

स्वातंत्र्यापूर्वी देशात ब्रिटीशांचं राज्य होतं. त्यामुळे देशाचा सर्व कारभार त्यांच्या अधिपत्याखाली चालायचा. ब्रिटीशांनी आपल्या काळात मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांना आपल्या सोयीनुसार नावे दिली होती. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली आहेत, मात्र अजूनही ब्रिटीशांनी दिलेली रेल्वे स्थानकांची नावे बदललेली नाहीत ती आता नव्याने लवकरच बदलणार असल्याच्या चर्चा सूरू झाल्या आहेत.

दरम्यान, शिवसेना खासदार राहूल शेवाळे(Rahul Shewale) यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे. अजूनही मुंबईतील अनेक रेल्वेस्थानके ही ब्रिटीशांच्या नावे ओळखले जातात. त्यामुळे सदर रेल्वेस्थानकांची नावे ही त्या-त्या परिसरातील स्थानिक इतिहास विचारून घेऊन नामांतरीत करणे महत्वाचे आहे. म्हणून मी आपणास मुंबईतील स्थानकांचे नामांतरण करण्याची सूची पत्रात नमुद करत आहे, तरी आपणास विनंती आहे की, पत्रातील सदर नमुद स्थानकांची नावे बदलण्याकरीता आपण तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, असं आवाहन खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

सध्या असलेली रेल्वेस्थानकांची नावे आणि सुचवलेली नावे

१. करी रोड - (लालबाग)

२. सँडहर्स्ट - रोड (डोंगरी)

३. मरीन लाईन्स - (मुंबादेवी)

४. चर्नी रोड - (गिरगांव)

५. कॉटन ग्रीन - (काळाचौकी)

६. डॉकयार्ड - (माझगाव)

७. किंग्ज सर्कल - (तिर्थंकर पार्श्वनाथ)

८. मुंबई सेंट्रल - (नाना जगन्नात शंकर शेट)

Updated : 13 March 2024 7:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top