Home > News Update > विरोधकांच्या नव्या आघाडीचं नाव आता INDIA

विरोधकांच्या नव्या आघाडीचं नाव आता INDIA

विरोधकांच्या नव्या आघाडीचं नाव आता INDIA
X

विरोधकांच्या नव्या आघाडीचं नाव आता INDIA

मुंबई – सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशपातळीवर विरोधक एकत्र आले आहेत. बंगळुरूमध्ये दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये विरोधकांच्या या नव्या आघाडीला INDIA असं नाव देण्यात आलंय.

मागील महिन्यात २३ जून रोजी बिहारच्या पाटणा इथं विरोधकांची पहिली बैठक पार पडली होती. त्यामध्ये देशभरातील १६ राजकीय पक्ष एकत्र आले होते. आता त्यात वाढ झाली असून बंगळुरू इथल्या दोन दिवसीय बैठकीत देशभरातून २६ राजकीय पक्षांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार उपस्थित होते.

INDIA या संक्षिप्त नावाचा फुल फॉर्म हा इंडियन नॅशनल डेमोक्रेटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स (Indian National Democratic Inclusive Alliance) असं ठेवण्यात आलंय. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीच याविषयी माहिती दिली. INDIA आघाडीची पुढील बैठक ही मुंबईत होणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आमच्या बैठकीतील सहभागी पक्षांची संख्या पाहून एनडीएनं ३० पक्षांची बैठक बोलावल्याचं खरगे यांनी सांगितलं. एनडीएच्या बैठकीत कुठले ३० पक्ष सहभागी होणार आहेत, हेच माहिती नाही. यापैकी किती पक्षांची निवडणूक आयोगाकडे नोंदणी आहे की नाही हे सुद्धा कुणाला माहिती नाही. एनडीएच्या बैठकीत सामील होणाऱ्या प७ची नावंही कधी ऐकलेली नसल्याचं खरगे म्हणाले.




Updated : 18 July 2023 4:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top