Home > News Update > हवामान विभागाने पावसाचा जोर वाढण्याचा दिला इशारा

हवामान विभागाने पावसाचा जोर वाढण्याचा दिला इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हा प्रशासनांना सावधगिरीच्या सूचना

हवामान विभागाने पावसाचा जोर वाढण्याचा दिला इशारा
X

बुधवारी मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पाहायला मिळाला. या पावसाने मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर परिणाम झालेला पाहायला मिळालाच पण काही ठिकाणी वाहतुक कोंडीही झालेली पाहायला मिळाली. आता पुढील काही दिवस पावसाचा जोर राज्यभरात असाच कायम असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे, याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्कतेच्या सुचना देखील दिल्या आहेत.

पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे असे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

कालही ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची घटना घडली महाराष्ट्रासह दक्षिण दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे.

एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना देखील सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे

Updated : 8 Sep 2022 4:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top