Home > News Update > बाळा नांदगावकर मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा मेसेज व्हायरल

बाळा नांदगावकर मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा मेसेज व्हायरल

बाळा नांदगावकर मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा मेसेज व्हायरल
X

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकीकडे निवडणुकांच्या तयारीसाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत, त्यातच पुणे दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा झटका बसला आहे. पुण्यातील मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यातच रुपाली पाटील ठोंबरे यांच्यानंतर मनसेचा आणखी एक मोठा नेता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

राज ठाकरेंसोबत सावलीप्रमाणे असणारे बाळा नांदगावर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. त्याबाबतचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंनी आणखी एक मोठा धक्का बसणार का? अशा चर्चा सुरु झाल्यात. पुण्याच्या दौऱ्याला बाळा नांदगावकर न गेल्याने ते स्वगृही परतणार अशा बातम्या आणि काही मेसेज फिरत आहेत त्यावर बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, दौऱ्याला न गेल्यानेच अशा चर्चा होत आहे,

"मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक, औरंगाबाद आणि पुणे दौरा सुरू आहे. नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यादरम्यान मी राज ठाकरे यांच्या सोबत होतो. पुण्याला जेव्हा राज ठाकरे आले तेव्हा मी मुंबईला परतलो. मुंबईत १८ तारखेला माझ्या मतदार संघात कार्यालयाचे उदघाटन साहेबांच्या हस्ते असल्याने मी तयारीसाठी मुंबईत आलो आहे." अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.सोबतच मी स्वगृही परतणार ही केवळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Updated : 16 Dec 2021 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top