Home > News Update > अंबानी कुटूंबियांना जिवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

अंबानी कुटूंबियांना जिवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

अंबानी कुटूंबियांना जिवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
X

प्रसिध्द उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आरोपीने सोमवारी सकाळी रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात फोनवर धमकीचा फोन केला होता. त्याने फोनवरून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील काही तासांतच डी. बी. मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

विष्णू विधू भोमीक असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीचं वय ५६ वर्षे आहे. त्याला डी बी मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. अशी माहिती झोन २ चे डीसीपी निलोत्पल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आरोपी विष्णू याला पोलिसांनी बोरिवली पश्चिम परिसरातून अटक केली आहे.

सोमवारी सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील फोनवर मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या फोननंतर रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना या धमकीच्या फोनबाबत माहिती दिली. या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन डी बी मार्ग पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून घटनेचा तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपास करत पुढील काही तासांत संशयित आरोपीला बोरिवली पश्चिमेतून अटक केली आहे.

Updated : 15 Aug 2022 2:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top