Home > News Update > नारायण राणेंच्या अटकेवर केंद्रीय नेतृत्वाची पहिली प्रतिक्रीया, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी केले ट्विट

नारायण राणेंच्या अटकेवर केंद्रीय नेतृत्वाची पहिली प्रतिक्रीया, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी केले ट्विट

नारायण राणेंच्या अटकेवर केंद्रीय नेतृत्वाची पहिली प्रतिक्रीया, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी केले ट्विट
X

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यानंतर महाराष्ट्रात पुणे, नाशिक आणि महाड पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले. नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटकदेखील केली. याप्रकरणी आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी , ट्विट करत "केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार किंवा दडपणार नाही. जन-आशीर्वाद यात्रेमध्ये भाजपला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे हे लोक त्रस्त झाले आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, हा प्रवास चालूच राहणार.", अशी प्रतिक्रीया दिली आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर कानशिलात लगावली असती अशा शब्दात टीका केली होती. यानंतर महाराष्ट्रात पुणे, नाशिक आणि महाड पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले. नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटकदेखील केली. परंतू त्यांच्या अटकेपर्यंत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नव्हती. त्यामुळे नारायण राणेंच्या अटकेवर केंद्रीय नेतृत्वाचे मौन का असे प्रश्न उपस्थित होत होते. देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या अटकेपुर्वी पत्रकार परीषद घेऊन राणेंच्या वक्तव्याचा निषेध करत पक्षाची भुमिका मांडली होती.

Updated : 24 Aug 2021 12:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top