Home > News Update > मनोज जरांगे यांच्या 24 तारखेच्या पहिल्या टप्प्यातील आंदोलनास सुरुवात

मनोज जरांगे यांच्या 24 तारखेच्या पहिल्या टप्प्यातील आंदोलनास सुरुवात

मनोज जरांगे यांच्या 24 तारखेच्या पहिल्या टप्प्यातील आंदोलनास सुरुवात
X

सग्या सोयऱ्याच्या कायद्याच्या अमलबजावणी करावी तसेच ओबीसीतुनच आरक्षण दयावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. विशेष अधिवेशनामध्ये सग्या सोयऱ्यांबाबत अंमलबजावणी न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.येत्या 24 तारखेला या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. यामध्ये गावा गावामध्ये रास्ता रोको करण्यात येणार आहे तसेच या आंदोलना दरम्यान लोकप्रतिनिधींना गावामध्ये बंदी असणार आहे. आज पासून या आंदोलनाची सुरुवात झाली असून रास्ता रोको संदर्भामध्ये निवेदन देण्यात येत आहेत. यानंतर 24 तारखेला सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत हा रास्ता रोको गावा गावात होणार आहे. दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थी यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी जरांगे पाटील यांनी ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा असेल त्यांना स्वतःहा मराठा बांधव हे आपल्या गाडीवर परीक्षा केंद्रावर सोडतील असं देखील काल झालेल्या बैठकीत सांगितलय. दरम्यान यानंतर घराघरातील सर्व मराठा समाजातील वयोवृद्ध सराटी अंतरवाली या ठिकाणी उपोषणास बसणार आहेत यावेळी या वयोवृद्धांना काही झाल्यास त्याची देखील जबाबदारी ही सरकारची असेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 मार्च रोजी एक मोठं असं जिल्हा स्तरावर रास्ता रोको आंदोलन होणार आहे ज्यामध्ये जिल्ह्यामधून लाखो मराठा समाज बांधव या रास्ता रोको मध्ये सहभागी होणार आहेत. तर आमदार खासदार यांना देखील या आंदोलना दरम्यान सराटी अंतरवाली येथे येउन या चर्चे साठी निमंत्रण देत निवडणुका पुढे ढकलाव्यात असं आव्हान जरांगे यांनी केलं आहे परंतु सरकार आता या आंदोलनाला किती गांभीर्याने घेईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated : 22 Feb 2024 12:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top