Home > News Update > लीना मणीमेकल 'काली' पोस्टरमुळे वादाच्या भोवऱ्यात, युपी आणि दिल्ल्लीतून FIR दाखल

लीना मणीमेकल 'काली' पोस्टरमुळे वादाच्या भोवऱ्यात, युपी आणि दिल्ल्लीतून FIR दाखल

लीना मणीमेकल काली पोस्टरमुळे वादाच्या भोवऱ्यात, युपी आणि दिल्ल्लीतून FIR दाखल
X

काली या माहितीपटाच्या पोस्टर वरून जोरदार टीका समाजमाध्यमांवर होत आहे.चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक लीना मणीमेकल यांचा हा माहितीपट आहे.ज्याचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमादरम्यान अगा खान संग्रहालयामध्ये हे पोस्टर लॉन्च करण्यात आलं होत .या माहितीपटाच्या पोस्टरमधून कालीमातेचा अपमान झाल्याचा दावा अनेकांनी केला आहे.

या पोस्टरवर काली माता या हिंदू देवतेच्या अवतारात एक महिला दिसत आहे.पण या महिलेच्या हातात सिगारेट आहे .सिगारेट ओढताना काली मातेच्या पेहराव्यात बसलेल्या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे.पण या पोस्टरमधून हिंदू लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने लीना मणीमेकल यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.दरम्यान लीना मणीमेकल यांच्या विरोधात उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये लीना मणीमेकल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून यासंबंधी ट्वीट करण्यात आलं आहे.

दिल्ली पोलिसांच्या आय एफ एस ओ युनिटने काली माहितीपटाच्या वादग्रस्त पोस्टरबद्दल निर्मात्या लीना मणीमेकल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने 'काली' माहितीपटाशी संबंधित एका वादग्रस्त पोस्टरबद्दल निर्मात्यांवर IPC कलम १५३ अ आणि २९५ अ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी 'काली' माहितीपटाच्या निर्मात्या लीना मणीमेकल यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने जाणूनबुजून शांततेचा भंग करण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे

'#ArrestLeenaManimekal' हा हॅटशॅग लिना मणीमेकल यांना अटक करण्यासाठी नेटकरी वापरत आहेत.धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लिना यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर लीना मणीमेकल यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी एक ट्वीट करत या वादावर आपली बाजू मांडली आहे .

लीना मणीमेकल सांगतात ...

लीना मणीमेकल यांनी लिहिलं, "माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. जी माणसं कोणतीही भीती न बाळगता आवाज उठवतात त्यांना माझा नेहमीच पाठिंबा असतो. मी कोणालाही घाबरत नाही आणि याची किंमत जर माझं आयुष्य असेल तर मी तेही द्यायला तयार आहे. हा चित्रपट एका अशा घटनेची कथा आहे ज्यात एका संध्याकाळी कालीमाता प्रकट होते आणि टोरंटोच्या रस्त्यांवरून फिरू लागते. जेव्हा तुम्ही हा माहितीपट पाहाल तेव्हा मला अटक करण्याचे हॅशटॅग न वापरता मला प्रेम द्याल."

महुआ मोईत्रा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात

एकीकडे लीना मणीमेकल यांच्या विरोधात संतापाचं वातावरण असताना ,या पोस्टरच्या विरोधात तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सुद्धा वादग्रस्त विधान केलं आहे .यासंदर्भात बोलताना महुआ मोईत्रा यांनी प्रत्येकाला आपल्या इश्वराविषयी कल्पना करण्याचं स्वातंत्र्य आहे, असं म्हटलं आहे. "माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे. तुमच्या ईश्वराविषयी कल्पना करण्याची तुम्हाला स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी ईश्वराला व्हिस्की नैवेद्य म्हणून दिली जाते, तर काही ठिकाणी ही ईश्वरनिंदा ठरते", असं महुआ मोईत्रा म्हणाल्या आहेत. या माहितीपटाचं पोस्टर २ जुलै ला लीना मणीमेकल यांनी ट्विटरवर शेअर केलं होत . यावर अनेक विरोधी प्रतिक्रिया आल्या आहेत .

Updated : 5 July 2022 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top