Home > News Update > खंडणी मागणाऱ्या बोगस पत्रकाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

खंडणी मागणाऱ्या बोगस पत्रकाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

खंडणी मागणाऱ्या बोगस पत्रकाराला पोलिसांनी घेतले ताब्यात
X

नवी मुंबईतील एका बारचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत. मी एका चॅनलचा प्रतिनिधी असून, ते व्हिडिओ चॅनलला प्रसारित करेन. ते न करण्यासाठी आपल्याला तीस हजार रुपये द्यावेत म्हणून फोन आला. शेवटी फिर्यादी हॉटेल मालकाने तीस हजार रुपये दिले. आणखी वीस हजारांची मागणी केल्याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करताच कोपरखैरणे पोलिसांनी सापळा रचून बोगस पत्रकार राजेंद्र साळुंखे याला ताब्यात घेत. त्याच्याकडून रोख रक्कमेसह मोबाईल आणि बाईक असा एकूण 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पुढील तपास कोपरखैरणे पोलीस करत आहेत.

Updated : 12 Aug 2023 3:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top