Home > News Update > दिव्यांगांचे शिक्षण व विकासाचा बृहत आराखडा येत्या एक महिन्यामध्ये सादर होणार- धनंजय मुंडे

दिव्यांगांचे शिक्षण व विकासाचा बृहत आराखडा येत्या एक महिन्यामध्ये सादर होणार- धनंजय मुंडे

दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण, उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालये उभारणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या स्वतंत्र संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष कालबद्ध कार्यक्रम राबविणे यासाठीचा बृहत आराखडा पुढील एक महिन्याच्या आत तयार करून तो मान्यतेसाठी सादर करण्यात येणार

दिव्यांगांचे शिक्षण व विकासाचा बृहत आराखडा येत्या एक महिन्यामध्ये सादर होणार- धनंजय मुंडे
X

मुंबई // दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण, उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालये उभारणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या स्वतंत्र संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष कालबद्ध कार्यक्रम राबविणे यासाठीचा बृहत आराखडा पुढील एक महिन्याच्या आत तयार करून तो मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच एका लक्षवेधीच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सोबतच दिव्यांग व्यक्तींचे हक्क तसेच स्वतंत्र महाविद्यालये आणि कौशल्य विकास यातून रोजगार निर्मिती यासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्यासाठी एक मंत्रिमंडळ उपसमितीचे गठणं केल्याची घोषणाही धनंजय मुंडे यांनी केली.

आ. दीपक चव्हाण यांनी याबाबत बोलताना म्हटले की, दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत सरकार सकारात्मक असल्याचे समाधान असून सामाजिक न्याय मंत्र्यांचे आभार मानायला हवेत .

दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतसह सर्व ठिकाणी 5% राखीव निधी असतो. मात्र , या निधीतून किंवा दिव्यांग अर्थसहाय्यतून त्यांच्या केवळ प्राथमिक गरजा पूर्ण करता येतात, त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण व अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्यास त्यांना सन्मानाने जगता येईल, असं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

लातूर जिल्ह्यातील ऑटिजम सेंटर व बाल मानसोपचार केंद्राच्या माध्यमातून एक हजार पेक्षा अधिक बालकांमधील प्राथमिक दिव्यांगत्व किंवा मानसिक आजार पूर्ण पणे बरे झालेत. या प्रकारचे ऑटिजम सेंटर प्रत्येक जिल्ह्यात सुरू करणेही राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे मुंडे यांनी यावेळी नमूद केले.

Updated : 23 Dec 2021 1:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top