Home > News Update > कर्नाटकात शाळा सुरू करण्याचा निर्णय महागात पडण्याची शक्यता ; 101 जणांना कोरोनाची लागण

कर्नाटकात शाळा सुरू करण्याचा निर्णय महागात पडण्याची शक्यता ; 101 जणांना कोरोनाची लागण

कर्नाटकात शाळा सुरू करण्याचा निर्णय महागात पडण्याची शक्यता ; 101 जणांना कोरोनाची लागण
X

चिकमंगळूरू : कोरोना साथीची लाट काहीशी ओसरल्याने शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र, हा निर्णय महागात पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील चिकमंगळूरू जिल्ह्यातील 90 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात एका शाळेत इतके कोरोनाबाधित विद्यार्थी आढळल्याने खळबळ उडाली आहे. बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सीगोडू येथील जवाहर नवोदय शाळेतील 59 विद्यार्थी आणि 10 कर्मचारी अशा एकूण 69 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर यात वाढ होऊन आणखी 21 विद्यार्थी आणि एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी आल्यानंतर ही संख्या आता 101 वर पोहोचली.

मोठ्या प्रमाणात कोविड -19 पॉझिटिव्ह प्रकरणे आढळल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाले की, शाळा सील केली जाईल आणि पुढील सात दिवसांसाठी शाळा बंद राहणार आहे.

शाळेतून एकूण 457 नमुने गोळा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी 69 नमुने पहिल्यांदाच पॉझिटिव्ह आले. सोमवारी या आकड्यात वाढ झाली आणि आता शैक्षणिक संस्थेतील 90 विद्यार्थी आणि 11 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत.

ओमीक्रॉनच्या संसर्गाचा धोका असताना दुसरीकडे कर्नाटकात कोरोना बाधित आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी, नांजप्पा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेसमध्ये 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले.

Updated : 7 Dec 2021 2:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top