'समृद्धी'वरील अपघातातील मृत्यूचं तांडव थांबेना!
X
समृद्धी वरील अपघातीती मृत्यूचं तांडव थांबता थांबत नाही.  शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धीवर वैजापूरजवळील जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, १४ जण जखमी झाले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
मृतांमधीला ११ जण नाशिक जिल्ह्यातील असून त्यामध्ये माय लेकींचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. हे सर्वजण बुलढाण्यातील सैलानी बाबाचे दर्शन घेऊन शिर्डीकडे जात होते. अपघातग्रस्त वाहनातून क्षेमतेपेक्षाही अधिक म्हणजेचं २८ जण प्रवास करत होते.
दरम्यान यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की "मध्यरात्री झालेल्या टेम्पो अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, याविषयीही माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले" असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.  | 
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी टेम्पो ट्रॅव्हलर गाडीत 28 जण होते. अपघातात 12 भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला. तर उर्वरित भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 14 जणांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत्यू झालेले ते 12 जण कोण?
मृतांची नावे समोर आली असून, तनुश्री सोळसे (वय 5), संगीता अस्वले (वय 40), अंजाबाई जगताप (वय 38), रतन जगधने (वय 45), कांतल सोळसे (वय 32), रजनी तपासे (वय 32), हौसाबाई शिरसाट (वय 70), झुंबर गांगुर्डे (वय 50), अमोल गांगुर्डे (वय 50), सारिका गांगुर्डे (वय 40), मिलिंद पगारे (वय 50), दीपक केकाने (वय 47) यांचा समावेश आहे.






