Home > News Update > दहावी बारावीच्या परीक्षांची तारीख ठरली; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्या तारखा

दहावी बारावीच्या परीक्षांची तारीख ठरली; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्या तारखा

दहावी बारावीच्या परीक्षांची तारीख ठरली; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्या तारखा
X

मुंबई : मागील दीड वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातही दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना विशेष मूल्यांकन पद्धतीनं गुण देण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु झालेत. म्हणूनच आता राज्यात या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारवेच्या परीक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. इयत्ता बारावीची बोर्डाची लेखी परीक्षा ही 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान होणार असल्याची माहिती मंत्री गायकवाड यांनी दिली. तर दहावी बोर्डाची परीक्षा ही 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे. दरम्यान या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, इयत्ता बारावीच्या तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 दरम्यान होणार आहे. तर इयत्ता दहावीच्या तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022 दरम्यान घेण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Updated : 16 Dec 2021 1:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top