Home > News Update > जिल्हाधिकाऱ्यांनी धरला आदिवासी मुलांसोबत नृत्यावर ठेका

जिल्हाधिकाऱ्यांनी धरला आदिवासी मुलांसोबत नृत्यावर ठेका

जागतिक आदिवासी दिनानिमित्त बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी आदिवासी मुलांसोबत नृत्यावर ठेका धरला

जिल्हाधिकाऱ्यांनी धरला आदिवासी मुलांसोबत नृत्यावर  ठेका
X

बुलडाणा : आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी जिल्ह्यातील जळगाव जामोद या आदिवासी तालुक्यातील चारबन या गावी भेट दिली , आदिवासींच्या शाळेतील चिमुकल्या मुलींसोबत जिल्हाधिकारी यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरत जागतिक आदिवासी दिन साजरा केला , त्याचबरोबर आज त्यांचा वाढदिवस देखील असल्याने त्यांनी वाढदिवस आदिवासी मुलांबरोबर साजरा केला. यावेळी चारबन या आदिवासी शाळेत अनेक आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

जळगांव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी ग्राम चारबन येथील जि.प.मराठी प्रा. शाळेमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिरसामुंडा जयंती, (आदिवासी दिन) जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यांनी यावेळी वृक्षारोपण करून आदिवाशींसोबत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग पण घेतला.

यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार सूर्यवंशी, व इतर महसूल अधिकारी उपस्थित होते.

Updated : 9 Aug 2021 3:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top