Home > News Update > कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंद पोलीस चौक्या पूर्ववत करणार- बशीर शेख

कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंद पोलीस चौक्या पूर्ववत करणार- बशीर शेख

कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंद पोलीस चौक्या पूर्ववत करणार- बशीर शेख
X

कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत असलेली गुन्हेगारी, चोऱ्या, मारामारी, लूट यांना आळा बसण्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बंद पोलीस चौक्या सुरू करण्याचे आदेश कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी दिली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण 5 पोलीस चौक्या येतात.

ज्यामधील खडगोलावली , लोग्राम ,नेतवली,विजयनगर , आनंदवाडी , पोलीस चौक्याचा समावेश आहे. यापैकी काही पोलीस चौकी यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तर काही ठिकाणी चौक्यांना टाळे लागले आहे. या चौक्या बंद असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंडाराज सुरू झाला असून गुन्हेगार वाढली आहे. ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी या चौक्या सुरू करण्यात यावे अशी मागणी स्थानिक आमदार व नागरिकांकडून वारंवार केली जात होती. दरम्यान कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी या चौक्या लवकरात लवकर सुरू करून या ठिकाणी गस्त घालत असलेल्या पोलिसांना या चौकीत थांबण्याचे आदेश दिले आहे. यामुळे कोळसेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारावर चाप बसणार आहे.

Updated : 10 Nov 2021 11:48 AM GMT
Next Story
Share it
Top