Home > News Update > महानगरपालिकेच्या बैठकीत सभागृहाची काच कोसळली

महानगरपालिकेच्या बैठकीत सभागृहाची काच कोसळली

महानगरपालिकेच्या बैठकीत सभागृहाची काच कोसळली
X

मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समिती सभादालनामध्ये बैठक सुरु असताना छताच्या भिंतीचा आरसा बैठक सुरु असताना कोसळला. सभागृहच्या दालनात महत्वाच्या विषयावर प्रीती पाटणकर स्थापत्य शहर समिती यांच्या अध्यक्षातेखाली नगरसेवक यांच्याशी बैठक सुरु असताना दुपारी २ वाजून ४५ मिनीटाच्या सुमारास काच कोसळून खाली पडल्यानं प्रीती पाटणकर यांच्या पाठीला आणि पायाला जखम झाली असून ३ नगरसेवक देखील जखमी झाले आहेत.

सभागृहात १६ नगरसेवक, आयुक्त बैठकीसाठी उपस्थित होते. प्रीती पाटणकर यांनी त्वरित वैद्यकीय उपचार घेतला. संयुक्त बैठकीत झालेल्या प्रकाराबद्दल निर्णय लवकरच घेण्यात येईल, सरकारी प्रशासनाचा भोंगळ कारभार चालू आहे, त्यामुळे अध्यक्ष्यांच्या अंगावर काच पडली अशी प्रतिक्रिया प्रीती पाटणकर यांनी ‘मॅक्स महाराष्ट्रशी’ बोलताना दिली....

Updated : 19 Dec 2019 4:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top