Home > News Update > जिल्ह्यात तीन मंत्री असताना जिल्ह्याला मदत मिळत नाही- माजी मंत्री शिंदे

जिल्ह्यात तीन मंत्री असताना जिल्ह्याला मदत मिळत नाही- माजी मंत्री शिंदे

जिल्ह्यात तीन मंत्री असताना जिल्ह्याला मदत मिळत नाही- माजी मंत्री शिंदे
X

अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्यात तीन - तीन मंत्री असताना जिल्ह्यातील समस्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही असं म्हणत आज भाजपच्या आजी- माजी आमदारांच्या शिष्टमंडळाने आज माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.

अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्यमार्गासह इतर रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्यामुळे वाहतूक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे अनेकांना आर्थिक तसेच शारीरिक झळ पोहोचत असून प्रवासात वेळ वाया जात आहे, कल्याण-विशाखापट्टणम महामार्गाचे नगर ते पाथर्डी या रस्त्याचे हे काम सुमारे चार वर्षापासून सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी काम पूर्ण झालेले आहे तेथे पावसामुळे खड्डे पडले आहेत, अशीच अवस्था जिल्ह्यातून जाणारे इतर महामार्ग व राज्य मार्गाची झालेले आहे या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे तर कितीतरी जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. राज्य सरकार मुरूम व खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी करत आहेत, परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यासाठी रस्ते दर्जेदार होणे गरजेचे आहे. सोबतच दर्जा तपासण्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी व हे सर्व रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे अशी मागणी भाजपने दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

सोबतच सलग दोन वर्षापासून कोरोना परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना सक्तीची वीज बिल वसुली केली जात आहे ती थांबवावी. या सक्तीच्या वीज बिल वसुलीमुळे कामगार , व्यापारी , सर्वसामान्य लोकांमध्ये संतापाची लाट आहे तसेच अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजेचे खांब पडले आहेत, रोहित्र जळालेले आहे. त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी भाजपकडू मागणी करण्यात आली.

त्याचबरोबर पाथर्डी, शेवगाव तालुक्यासह इतर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे असा नुकसानग्रस्तांना अद्यापही सरकारकडून मदत मिळालेली नाही ती त्वरीत द्यावी असा मुख्य तीन मागण्या घेऊन आज माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यातील भाजप आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डीले, स्नेहलता कोल्हे , भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यासह भाजप नेत्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.दरम्यान या मागण्या तातडीने पूर्ण केल्या नाही तर कुठलीही कल्पना न देता भारतीय जनता पार्टी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा भाजपच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आला.

Updated : 30 Sep 2021 11:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top